ब्राइट्स सोसायटीतर्फे आयोजित नास्तिक परिषद – २०२५
सेवाग्राम, वर्धा येथे १४ ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ब्राइट्स सोसायटीने नास्तिक परिषद आयोजित केली होती. ह्या तीन दिवसीय निवासी परिषदेत देशभरातून सुमारे ३०० जण सहभागी झाले होते. परिषदेत सहभागी झालेल्यांपैकी काहींच्या प्रतिक्रिया प्रकाशित करीत आहोत ब्राइट सोसायटीविषयी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी, समाज व बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक ह्यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी, तसेच कला, विज्ञान–तंत्रज्ञान, उद्योग, समाजसेवा, राजकारण, आदि …